पुरस्काराबद्दल

शिक्षकांच्या निष्ठावान कार्याला हक्काचा सन्मान देणारा उपक्रम

प्रस्तावना, उद्देश आणि अ‍ॅस्पायर फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. बबनराव मधुकर वाघ यांचे मनोगत

प्रस्तावना

"माझे शिक्षक" — निवृत्तीनंतरही विद्यार्थ्यांच्या मनात कायम राहणारी ओळख

शिक्षण हा समाजाच्या विकासाचा मजबूत पाया आहे. शिक्षक हे विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्याचे महत्त्वाचे काम करत असतात. चांगले संस्कार, ज्ञान आणि योग्य मार्गदर्शन देऊन ते देशाचे आदर्श नागरिक घडवतात. त्यामुळे समाज आणि राष्ट्राच्या प्रगतीमध्ये शिक्षकांचे योगदान खूप मोठे आहे. इतर अनेक व्यवसायांमध्ये निवृत्तीनंतर व्यक्तींना "माजी" म्हणून ओळखले जाते, पण शिक्षक मात्र आपल्या विद्यार्थ्यांच्या मनात आयुष्यभर "माझे शिक्षक" म्हणून कायम राहतात. हेच शिक्षकांच्या कार्याचे महत्त्व दाखवून देते.

आजचे विद्यार्थी हे उद्याचे देशाचे भविष्य आहेत. त्यांना सक्षम आणि संस्कारक्षम बनवण्यासाठी राज्यातील अनेक शिक्षक प्रामाणिकपणे आणि सेवाभावी वृत्तीने काम करत आहेत. अनेक शिक्षक नवीन उपक्रम राबवून शिक्षणाची गुणवत्ता वाढवत आहेत. अशा शिक्षकांचा गौरव करण्यासाठी शासन आणि विविध संस्था आदर्श शिक्षक पुरस्कार देतात. मात्र, अनेक चांगले आणि मेहनती शिक्षक या पुरस्कारांपासून वंचित राहतात आणि त्यांच्या कार्याची माहिती समाजापर्यंत पोहोचत नाही.

अशा शिक्षकांच्या कार्याचा सन्मान व्हावा आणि त्यांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने "अ‍ॅस्पायर फाउंडेशन राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६" आयोजित करण्यात येत आहे.

या पुरस्कारासाठी राज्यभरातून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. अ‍ॅस्पायर फाउंडेशनची तज्ज्ञ समिती सर्व प्रस्तावांची तपासणी करून विविध निकषांच्या आधारे राज्यातील १०० शिक्षकांची "राज्य आदर्श शिक्षक" म्हणून निवड करेल. तसेच प्रत्येक जिल्ह्यातील १० शिक्षक असे एकूण ३६० शिक्षकांची "जिल्हा आदर्श शिक्षक" म्हणून निवड करण्यात येईल.

याशिवाय, प्रत्येक तालुक्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना "तालुका आदर्श शिक्षक" पुरस्कार देण्यात येतील. तसेच विशेष कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना "विशेष आदर्श शिक्षक पुरस्कार" देऊन सन्मानित करण्यात येईल.

ऑनलाईन पद्धतीने नामनिर्देशन प्रस्ताव दाखल करणाऱ्या इतर सर्व सहभागी शिक्षकांनाही पुरस्कार सोहळ्याचा दिवशी मंचावर मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल

या उपक्रमातून उपक्रमशील शिक्षकांच्या चांगल्या कामाची माहिती समाजापर्यंत पोहोचवणे, त्यांना प्रोत्साहन देणे आणि शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणणे हा अ‍ॅस्पायर फाउंडेशनचा मुख्य उद्देश आहे. तसेच निवडक शाळांना शालेय उपयोगासाठी डिजिटल साहित्य देणगी स्वरूपात दिले जाईल.

या पानावर काय आहे
प्रस्तावनापुरस्काराची पार्श्वभूमी व गरज
उद्दिष्टेफाउंडेशनचा मुख्य हेतू
अध्यक्षांचे मनोगतसंस्थापकांचा संदेश
नामनिर्देशन करा
मुख्य उद्दिष्टे

प्रस्तावनेतून स्पष्ट होणारी फाउंडेशनची उद्दिष्टे

वंचित गुणवंत शिक्षकांचा सन्मान

शासकीय पुरस्कारांपासून वंचित राहिलेल्या मेहनती शिक्षकांना ओळख मिळवून देणे.

कार्याची माहिती समाजापर्यंत

उपक्रमशील शिक्षकांच्या चांगल्या कामाची माहिती समाजापर्यंत पोहोचवणे.

प्रोत्साहन व सकारात्मक बदल

शिक्षकांना प्रोत्साहन देऊन शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडवणे.

शाळांना डिजिटल साहित्य देणगी

निवडक शाळांना शालेय उपयोगासाठी डिजिटल साहित्य देणगी स्वरूपात देणे.

अध्यक्षांचे मनोगत

संस्थापक-अध्यक्षांचा शिक्षक बंधू-भगिनींना संदेश

श्री. बबनराव मधुकर वाघ
श्री. बबनराव मधुकर वाघ
संस्थापक - अध्यक्ष, अ‍ॅस्पायर फाउंडेशन, महाराष्ट्र

प्रिय शिक्षक बंधू-भगिनींनो,

शिक्षक हा समाजाचा आधारस्तंभ आहे. विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देण्याचे आणि देशाचे सुजाण नागरिक घडवण्याचे महान कार्य आपण सर्वजण निष्ठेने करत आहात. आपल्या ज्ञान, संस्कार आणि सेवेमुळे समाज अधिक सक्षम आणि समृद्ध होत आहे.

राज्यातील अनेक शिक्षक शांतपणे आणि प्रामाणिकपणे उत्कृष्ट काम करत आहेत. मात्र, त्यांच्या कार्याची दखल अनेकदा घेतली जात नाही. अशा गुणवंत, उपक्रमशील आणि समाजाभिमुख शिक्षकांना योग्य व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा, या उद्देशाने अ‍ॅस्पायर फाउंडेशनतर्फे "राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६" आयोजित करण्यात आला आहे.

हा पुरस्कार केवळ सन्मान नसून, राज्यातील प्रेरणादायी शिक्षकांचे कार्य समाजापर्यंत पोहोचवण्याचा आणि इतर शिक्षकांना प्रोत्साहन देण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. आपल्या अनुभवातून, नाविन्यपूर्ण उपक्रमातून आणि विद्यार्थ्यांसाठी केलेल्या कार्यातून आपण समाजासमोर एक आदर्श निर्माण करत आहात.

म्हणूनच, राज्यातील सर्व पात्र शिक्षक बंधू-भगिनींना नम्र आवाहन आहे की, त्यांनी या पुरस्कारासाठी आपले नामनिर्देशन प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने निश्चितपणे सादर करावेत. तसेच आपल्या परिसरातील इतर गुणवंत शिक्षकांनाही या उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे.

आपल्या कार्याचा योग्य सन्मान करणे ही आमची जबाबदारी आणि आपल्यासारख्या शिक्षकांचा आशीर्वाद मिळणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.

आपल्या उज्ज्वल कार्यास मनःपूर्वक शुभेच्छा! धन्यवाद!

श्री. बबनराव मधुकर वाघ अध्यक्ष, अ‍ॅस्पायर फाउंडेशन, महाराष्ट्र
पुढे वाचा

पुरस्काराबद्दल अधिक तपशीलवार माहिती

आपल्या कार्याचा सन्मान होण्याची वेळ आली आहे

राज्यातील शेकडो शिक्षकांप्रमाणे आपणही आपले नामनिर्देशन प्रस्ताव आजच दाखल करा.

नामनिर्देशन प्रस्ताव दाखल करा
संपर्क

आमच्याशी संपर्क साधा

हेल्पलाईन
9325005833, 9226646474, 7058397976
व्हॉट्सअ‍ॅप
9325005833
कार्यक्रम स्थळ
बँक्वेट हॉल, नांदूर नाका, नाशिक, महाराष्ट्र
वेबसाईट
www.shikshakpuraskar.com

आपला प्रश्न पाठवा