निवड झालेल्या पुरस्कार्थींचा व पुरस्कारासाठी उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान व्हावा यासाठी "अॅस्पायर फाउंडेशन राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६" पुरस्कार प्रदान सोहळा हा भव्यदिव्य अशा सभागृहात आयोजित करण्याचा अॅस्पायर फाउंडेशनचा मानस आहे. राज्यातील पुरस्कार प्राप्त सर्व शिक्षकांना व शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांना सोयीस्कर होईल या उद्देशाने राज्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नाशिक शहरात नांदूर नाका या ठिकाणी भव्य बँक्वेट हॉलमध्ये रविवार दिनांक १८ ऑक्टोबर २०२६ या दिवशी भव्य असा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येणार आहे.
अंतिम निवड झालेल्या पुरस्कारार्थींना फोन, ईमेल व व्हॉट्सअॅपद्वारे पुरस्कार सोहळ्याचे निमंत्रण पत्र सोहळ्याच्या तारखेच्या १० दिवस आधी कळवण्यात येईल.
पुरस्कार सोहळ्यासाठी शिक्षकांना स्वखर्चाने पुरस्कारस्थळी उपस्थित राहावे लागेल. पुरस्कार सोहळ्याच्या दिवशी उपस्थित पुरस्कार्थी व त्यांच्या सोबत आलेल्या मित्रपरिवाराच्या चहापानाची सोय अॅस्पायर फाउंडेशनमार्फत करण्यात येईल.
पुरस्कार सोहळ्यासाठी राजकीय व शिक्षण क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत. सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करत असताना फोटो सेशन व व्हिडिओ शूटिंग करण्यात येणार आहे. सदर फोटो आणि व्हिडिओ संबंधित शिक्षक बंधू-भगिनींना व्हॉट्सअॅपद्वारे पाठविण्यात येतील तसेच अधिकृत वेबसाईट व सोशल मीडिया हँडल्स फेसबुक आणि इंस्टाग्रामवर शेअर केले जातील.