पात्रता व कागदपत्रे

प्रस्ताव दाखल करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचा

पात्रता, अपात्रता व आवश्यक स्वयंसाक्षांकित कागदपत्रांची संपूर्ण यादी

प्रस्तावासाठी आवश्यक अटी

प्रस्ताव दाखल करण्यासाठी संपूर्ण पात्रता अटी

खालील सर्व १५ अटी माहितीपत्रकात नमूद केल्याप्रमाणे — प्रस्ताव दाखल करण्यापूर्वी प्रत्येक अट काळजीपूर्वक वाचावी.

महाराष्ट्र राज्यातील मान्यताप्राप्त (खाजगी अथवा सरकारी) शाळेत (प्राथमिक, माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक) शिक्षक म्हणून सेवेत असावा.
मराठी, इंग्रजी व उर्दू माध्यमाच्या कोणत्याही सरकारी, निमसरकारी, खाजगी, स्थानिक स्वराज संस्था यांच्या शाळांमध्ये सेवेत असलेले शिक्षक प्रस्ताव दाखल करण्यासाठी पात्र आहेत.
स्टेट बोर्ड, सी.बी.एस.ई. बोर्ड, आय.सी.एस.ई. बोर्ड तसेच आय.जी.सी.एस.ई. बोर्डाच्या शाळांतील शिक्षक प्रस्ताव दाखल करण्यास पात्र आहेत.
शिक्षक एकूण सेवा किमान १ वर्षे आवश्यक.
शिक्षक निर्व्यसनी असावेत — अंतिम निवड यादी जाहीर करताना तज्ज्ञ समितीमार्फत शिक्षक ज्या शाळेत कार्यरत आहे त्या शाळेच्या व्यवस्थापनाशी संपर्क करून याची खातरजमा केली जाईल.
शिक्षकांनी शिकवणीत सहभागी होऊ नये.
शाळेला UDISE Code असणे आवश्यक. मान्यता नसलेल्या शाळा, खाजगी शिकवणी वर्गातील शिक्षक, खाजगी ऑनलाईन पोर्टल/वेबसाईटवर अध्यापन करणाऱ्या व्यक्ती, पूर्व प्राथमिक शाळा शिक्षक प्रस्ताव दाखल करण्यास पात्र नाहीत.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग (NIOS) अंतर्गत सुरू असणाऱ्या स्पेशल स्कूल्समध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असणारे शिक्षक शाळेला UDISE Code नसेल तरीही प्रस्ताव दाखल करण्यास पात्र राहतील. त्यांच्यासाठी नियमित शिक्षकांव्यतिरिक्त उत्तेजनार्थ विशेष पुरस्कार प्रदान केले जातील.
शिक्षकांनी नामनिर्देशनासाठी सादर केलेले पुरावे स्वयंसाक्षांकित करणे आवश्यक आहे. अ‍ॅस्पायर फाउंडेशन ही संस्था शासनाशी संलग्न नसल्याने सदर पुरावे शाळेचे मुख्याध्यापक, गटशिक्षणअधिकारी अथवा प्रशासन अधिकारी यांनी प्रमाणित करण्याची आवश्यकता नाही, परंतु दिलेली माहिती व पुरावे चुकीचे अथवा दिशाभूल करणारे नसावेत.
१०
प्राथमिक स्वरूपात निवड झालेल्या सर्व आदर्श शिक्षकांचे प्रस्तावातील माहिती व पुरावे, शिक्षक ज्या शाळांत कार्यरत असतील त्या शाळांशी संपर्क करून खातरजमा करून घेतली जाईल; त्यानंतरच सदर शिक्षकांची यादी वेबसाईट, सोशल मीडिया हँडल व वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करण्यात येईल.
११
प्रस्ताव दाखल करणाऱ्या शिक्षकांची कसल्याही प्रकारची विभागीय चौकशी सुरू नसावी.
१२
कोणत्याही कारणास्तव निलंबित असलेले शिक्षक प्रस्ताव दाखल करण्यास पात्र नाहीत.
१३
शिक्षकांनी प्रस्तावात दाखल केलेल्या कार्याचे मूल्यमापन तज्ज्ञ समितीकडून गुणांकनाद्वारे केले जाईल.
१४
प्रतिनियुक्तीवर कार्यरत असलेले शिक्षक प्रस्ताव दाखल करण्यास पात्र नाहीत.
१५
नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद तसेच राज्य अथवा केंद्र शासनाचे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी कृपया नामनिर्देशन प्रस्ताव दाखल करू नयेत. सदर शिक्षकांनी कृपया फोन व ईमेलद्वारे अ‍ॅस्पायर फाउंडेशनला संपर्क करून आपले बहुमूल्य मार्गदर्शन करावे.
थोडक्यात सारांश

पात्र व अपात्र शिक्षकांची यादी

पात्र शिक्षक
  • महाराष्ट्र राज्यातील मान्यताप्राप्त (खाजगी/सरकारी) शाळेत प्राथमिक, माध्यमिक अथवा उच्च माध्यमिक स्तरावर कार्यरत शिक्षक
  • मराठी, इंग्रजी व उर्दू माध्यमाच्या शासकीय, निमशासकीय, खाजगी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील शिक्षक
  • स्टेट बोर्ड, सी.बी.एस.ई., आय.सी.एस.ई. तसेच आय.जी.सी.एस.ई. बोर्डाच्या शाळांतील शिक्षक
  • किमान १ वर्ष एकूण सेवा पूर्ण असलेले शिक्षक
  • निर्व्यसनी शिक्षक (शाळा व्यवस्थापनाकडून खातरजमा केली जाईल)
  • UDISE Code असलेल्या शाळेतील शिक्षक
  • NIOS अंतर्गत स्पेशल स्कूल्समधील शिक्षक (UDISE Code नसला तरीही, उत्तेजनार्थ विशेष पुरस्कारासाठी)
अपात्र / प्रस्ताव दाखल न करणारे
  • मान्यता नसलेल्या शाळांतील शिक्षक
  • खाजगी शिकवणी वर्गातील शिक्षक व शिकवणीत सहभागी शिक्षक
  • खाजगी ऑनलाईन पोर्टल/वेबसाईटवर अध्यापन करणाऱ्या व्यक्ती
  • पूर्व प्राथमिक शाळा शिक्षक
  • विभागीय चौकशी सुरू असलेले शिक्षक
  • कोणत्याही कारणास्तव निलंबित शिक्षक
  • प्रतिनियुक्तीवर कार्यरत शिक्षक
  • नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, राज्य अथवा केंद्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार आधीच प्राप्त शिक्षक

मान्यताप्राप्त खाजगी शाळांतील शिक्षकांकडूनही प्रस्ताव मागवण्यात येत असून अशा शिक्षकांना वरीलपैकी काही निकष लागू होतीलच असे नाही. अशा शिक्षकांनी वरील निकषांशी साधर्म्य असलेले जे योगदान शैक्षणिक कार्यात दिले असेल त्याची इत्यंभूत माहिती प्रस्तावात द्यावी.

आवश्यक कागदपत्रे

प्रस्तावासोबत जोडावयाची कागदपत्रे (स्वयंसाक्षांकित)

शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्रे

अतिरिक्त शैक्षणिक अर्हतेच्या स्वयंसाक्षांकित प्रति

पुरस्कार / प्रशस्तीपत्रके

विद्यार्थी व शिक्षकांना प्राप्त पुरस्कारांचे पुरावे

प्रकाशित लेख / संशोधन

वृत्तपत्र/नियतकालिकातील लेख अथवा संशोधनपर निबंध

सेवा अभिलेख

शाळानिहाय सेवा कालावधीचा तपशील

ग्रंथ / पुस्तक लेखन

प्रकाशित पुस्तकांच्या मुखपृष्ठाची / नोंदणीची प्रत

प्रशिक्षण मार्गदर्शक पुरावा

तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून सहभागाचे प्रमाणपत्र

सामाजिक उपक्रम पुरावा

रक्तदान, पर्यावरण, आपत्ती व्यवस्थापन इ. सहभागाचे फोटो/प्रमाणपत्र

ऑनलाईन साहित्यनिर्मिती

ब्लॉग/वेबसाईट/युट्युब लिंकचा तपशील

टीप: प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने दाखल करत असल्यास स्वतंत्र ऑफलाईन अर्ज सादर करण्याची आवश्यकता नाही. सर्व कागदपत्रे स्वयंसाक्षांकित असावीत — शाळा प्रशासनाकडून प्रमाणित करण्याची आवश्यकता नाही, मात्र माहिती अचूक व सत्य असावी.

पुढे वाचा

पुढील पायरी

आपल्या कार्याचा सन्मान होण्याची वेळ आली आहे

राज्यातील शेकडो शिक्षकांप्रमाणे आपणही आपले नामनिर्देशन प्रस्ताव आजच दाखल करा.

नामनिर्देशन प्रस्ताव दाखल करा
संपर्क

आमच्याशी संपर्क साधा

हेल्पलाईन
9325005833, 9226646474, 7058397976
व्हॉट्सअ‍ॅप
9325005833
कार्यक्रम स्थळ
बँक्वेट हॉल, नांदूर नाका, नाशिक, महाराष्ट्र
वेबसाईट
www.shikshakpuraskar.com

आपला प्रश्न पाठवा